जय ज्योति..जय क्रांति.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचा आदर्श नमुना..
सुस्वागतम..
सुस्वागतम.. सुस्वागतम..
मानवाचा एकच धर्म असावा..
सत्याने वर्तावा ज्योती म्हणे..
समता आणि सत्यासाठी आपला देह झिजवणारे, आपल्या जीवनात सत्य हा एकमेव धर्म मानून आयुष्यभर दीन-दुबळ्यांची सेवा
करणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ
रोवणारे, बहुजनांचे उद्धारक, थोर विचारवंत, महान समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा
ज्योतिबा फुले यांची आज जयंती व त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. सर्वप्रथम या उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी ------------------- शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक असे
स्वागत करतो/करते.
मोडूनी काढत अंधश्रद्धा, बनविले तुम्ही आम्हां सत्यशोधक..
नाही होणार पुन्हा कधीही, तुमच्या सारखा थोर समाजसुधारक..
तुमच्या सारखा महान समाजसुधारक..
💥अध्यक्ष निवड
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात
ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना काहीतरी ध्येय गाठायचे असते. या महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी विचाराप्रमाणेच ठाम
निर्धार असलेले सन्माननीय श्री--------------- हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारतील, अशी मी त्यांना विनंती
करतो/करते.
💥प्रमुख पाहुणे
नवीन विचार तर दररोज येत असतात,पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष.. या महात्मा फुले यांच्या उक्तीप्रमाणेच नवनवीन संकल्पना मांडून शाळेच्या प्रगतीमध्ये नेहमी मोलाची भूमिका बजावणारे, नेहमी सहकार्य करणारे या ठिकाणी उपस्थित मान्यवर माननीय श्री ------------------------------- हे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
💥प्रतिमापूजन
अज्ञान
आणि अंधकाराचा होवो नाश,
जीवनात येवो सदा प्रकाश,
क्रांतिसूर्याला करुनी शतशः नमन,
मान्यवरांनी करावे प्रतिमापूजन..
मान्यवरांनी करावे प्रतिमापूजन..
आजच्या कार्यक्रमाचे
अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांनी या ठिकाणी
प्रतिमा पूजन करावे, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
💥 स्वागत गीत
स्वागत
नसे हे फक्त हा तर असे जिव्हाळा..
मान्यवरांच्या
पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा..
या ठिकाणी आपल्या शाळेतील -------------------- हे
विद्यार्थी स्वागत गीत सादर करणार आहेत, तरी मी त्यांना स्वागत गीतासाठी आमंत्रित करतो/करते.
💥 प्रास्ताविक
गुरुजनांचा
आशिर्वाद घेऊन, साथ द्यावी सर्वांनी मिळून,
आजच्या
कार्यक्रमाचा उद्देश, जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून..
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ------------------- हे
सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
💥विद्यार्थी भाषणे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी, त्यांच्या संघर्षाविषयी माहिती देण्यासाठी आपल्या शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी आपली मनोगते सादर करणार आहेत. आपण या चिमुकल्यांची मनोगते शांतपणे ऐकावीत, अशी मी आपणास विनंती करतो/करते.
💥तज्ञ मार्गदर्शन
शब्दाला
गरज असते अर्थाची, फुलाला गरज असते सुगंधाची,
तसेच
आम्हाला नेहमीच गरज आहे आपल्या मार्गदर्शनाची..
या ठिकाणी श्री --------------------- हे आपल्याला
मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
💥अध्यक्षीय भाषण
ज्ञानरूपी
मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा,
त्यासाठीचं
तर मान आहे खरा अध्यक्षीय भाषणाचा..
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री ----------------- हे
या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
💥 आभार प्रदर्शन
ज्ञान
कुंभ रीता करूनी.. अनमोल प्रेरक ज्ञान दिले,
बोधामृत
पाजूनी ज्ञानाचे.. आम्हा उपकृत केले,
तुम्ही
पाठीराखे आमुचे.. सदा तुमचाच आधार,
मार्गदर्शन
असू द्यावे नित्य.. स्वीकारूनी हे आभार..
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री --------------- हे
करतील अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
👉हे लक्षात असू द्या..
- वरील सूत्रसंचालन हा फक्त एक नमूना आहे.
- आपण स्थानिक परिस्थिति नुसार त्यामध्ये योग्य तो बदल करावा.