शिवजयंती सूत्रसंचलन

 नमस्कार, या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी आपल्याला उपयोगी पडेल असा शिवजयंती सूत्रसंचलनाचा उत्कृष्ठ नमूना या ठिकाणी बघणार आहोत..चला तर सुरुवात करुयात ..🚩🚩

shivjayanti

🚩शिवजयंती सूत्रसंचालन  

सुस्वागतम .. सुस्वागतम .. सुस्वागतम ..

अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या भारत भूमीतील सर्व थोर समाज सुधारकांना सर्वप्रथम वंदन करून आपण आपल्या या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास सुरुवात करूयात.. सर्वप्रथम मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो/करते. 

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. 

मातीच्या कणावर.. आणि विश्वासाच्या प्रमाणावर.. 

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानावर पडता आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. शिवबा,जाणता राजा, शिवराय,रयतेचा राजा हे शब्द कानी पडले तर आपली छाती अभिमानाने फुलून येते. अशा या शौर्याच्या अखंड स्त्रोताची, एका झंजावाती वादळाची, रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती व ती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत 

🚩अध्यक्ष निवड  

स्वतःसाठी तर सर्व जगतात,पण कधी कधी इतरांसाठी जगून बघाव, त्यांच्या डोळ्यांतील आसवं पुसतानां,त्यामध्ये स्वतःच प्रतिबिंब बघावं.. या उक्तीप्रमाणे आदर्शवत जीवन जगणारे सन्माननीय श्री --------------------------------- हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो/करते. 

🚩प्रमुख पाहुणे  

स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने समाजामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करणारे, सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे मार्गदर्शक श्री---------------------------------- हे या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते. 

🚩प्रतिमापूजन/दिपप्रज्वलन 

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवर यांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो/करते की, त्यांनी आपल्या शुभहस्ते या ठिकाणी प्रतिमापूजन/दिपप्रज्वलन करावे. 

सुमंगल वातावरणात, समच्या उजळल्या वाती.. 

मान्यवरांनी शुभहस्ते, प्रज्वलित करावे ज्ञानज्योती..

🚩स्वागतगीत 

स्वागत नसे हे फक्त, हा तर असे जिव्हाळा..

आमच्यासाठी खरे तर, हा आहे आनंदाचा सोहळा.. 

उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमच्या विद्यार्थीनी ------------------------------स्वागत गीत सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🚩प्रास्ताविक 

 छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अनमोल रत्न. त्यांच्या नावाचा अर्थ या ठिकाणी खूप छान प्रकारे सांगितलेला आहे. 

- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, 

त्र - त्रस्त मोगलांना करणारे, 

- परत न फिरणारे, 

ती - तिन्ही जगात कीर्ती मिळविणारे, 

शि - शिस्तप्रिय, 

वा - वाणिज तेज, 

जी - जिजाऊंचे पुत्र, 

- महाराष्ट्राची शान, 

हा - हार न मानणारे, 

रा - राज्याचे हितचिंतक, 

- जनतेचा राजा..

 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.. अशा या जाणत्या राजाचा आज जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचा सार ,उद्देश म्हणजेच प्रास्ताविक.. त्यामुळे या ठिकाणी श्री--------------------- प्रास्ताविक सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते. 

 🚩विद्यार्थी भाषणे  

  •  

🚩तज्ञ मार्गदर्शन

सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर,  

शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन,  

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..

छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे जणू एक प्रेरणादायी प्रवास. अशा या छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी, त्यांचे कार्य व त्यांची शिकवण आपल्याला समजावून सांगण्यासाठी, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तरी मी या ठिकाणी श्री-------------------- यांना अशी विनंती करतो/करते की, त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. 

🚩अध्यक्षीय भाषण 

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमांतून कळस गाठू प्रगतीचा.. 

त्यासाठी खरे तर मान आहे, अध्यक्षीय भाषणाचा.. 

या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री------------------------- हे आपल्याला मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते. 

 🚩आभार प्रदर्शन  

किती आले किती गेले, केले मुघलांना हद्दपार.. 

राजे बहु धरतीवरती, ना कुणा शिवबांची सर.. 

सह्याद्रीच्या रांगांवरती, सदा मुघलांच्या नजरा.. 

बोटे छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. 

सदा गाई तुझे गुणगान, असा माझ्या पोटी वंश दे.. 

फक्त तुझ्या,फक्त तुझ्याच, शिवशौर्याचा तू अंश दे.. 

बघता बघता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहोत. या ठिकाणी आभार प्रदर्शनाची वेळ झालेली आहे. तरी मी श्री ------------------------- यांना अशी विनंती करतो/करते की, त्यांनी आभार प्रदर्शन करावे. 


(टीप :- वरील सूत्रसंचलन हा फक्त एक नमूना असून आपण यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य तो बदल करावा.)

 

 

 



Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post