डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती सूत्रसंचालन

 विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे की 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे लाडके राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. तुमच्या शाळेत देखील त्यांची जयंती साजरी होणार असेलचं. कोणताही कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर त्यामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. या पोस्टमध्ये आपण एक उत्कृष्ट सूत्रसंचालनाचा नमुना बघणार आहोत.कृपया सर्वांनी काळजीपूर्वक त्याचे वाचन करावे व आवश्यक तेथे सोयीनुसार योग्य ते बदल करावेत. 

डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती सूत्रसंचालन

apj abdul kalam jayanti



स्वागत
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

• आज 15 ऑक्टोबर 2024.. म्हणजेच भारताचे लाडके राष्ट्रपती ज्यांना जनतेचे राष्ट्रपती देखील म्हणतात असे थोर शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले, प्रतिभावंत लेखक, भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती व ती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत.

• सर्वप्रथम मी ...................... या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(तुमच्या शाळेचे नाव) ...............  हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो/करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो/करते.

अध्यक्ष निवड 

• माणसाचा स्वभाव,त्याचे कर्तृत्व त्याची समाजात ओळख निर्माण करत असतात. असेच आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजामध्ये ओळख निर्माण केलेले सोज्वळ स्वभावाचे धनी श्री....................... हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

  • आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी स्थानापन्न व्हावे, अशी मी त्यांना विनंती करतो/करते. 

प्रमुख पाहुणे यांना स्थानापन्न करणे

  • शाळेच्या विकासामध्ये समाजाचा खूप मोठा वाटा असतो. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शाळेची प्रगती होत नाही. असेच वेळोवेळी शाळेला सहकार्य करणारे या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील,अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

प्रतिमा पुजन

  • ज्यांचं अख्खं जीवन या जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे अशा या थोर महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांनी प्रतिमा पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

स्वागत गीत

• या ठिकाणी नुकतेच प्रतिमापूजन संपन्न झालेले आहे. आलेल्या मान्यवरांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी आपल्यासमोर स्वागत गीत घेऊन येत आहे..........................

(या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एखादे स्वागत गीत सादर करावे.)

प्रास्ताविक 

काम ऐसा करो की एक पहचान बन जाये..
• हर कदम ऐसा चलो की एक निशान बन जाये..
• यहा जिंदगी तो हर कोई काट लेता है जनाब..
• जिंदगी जियो तो इस तरह की एक मिसाल बन जाये..
  • अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
  • खरंच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासच आहे... त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू होते. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती, कणखर मन, आत्मविश्वास, दिलदार स्वभाव यामुळे तरुणाईला ते नेहमीच प्रेरणादायी वाटतात. त्यांना वाचनाचे खूप वेड होते.. ते म्हणायचे, एक चांगले पुस्तक हे हजार मित्रांसारखे असते... त्यांचं वाचन प्रेम हे सर्वश्रुत होते.. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा केला जातो.

विद्यार्थी मनोगते 

या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासाबद्दल आपल्याला माहिती सांगण्यासाठी आमच्या शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.. आपण सर्वांनी त्यांची मनोगते शांतपणे ऐकायची आहेत.



  1.       
  2.    
  3.      
      (सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये आपण वेगवेगळ्या चारोळ्या किंवा अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायक विचार विद्यार्थ्यांना सांगू शकतो.)

तज्ञांचे मार्गदर्शन

  • विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आपली मनोगते या ठिकाणी सादर केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीचं आहे.
  • यानंतर आपल्याला आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून सखोल मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे...
  • (या ठिकाणी प्रमुख वक्त्यांची नावे एक एक करून घ्यावीत.)

 आभार प्रदर्शन

आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. 
कार्यक्रम झाला बहारदार..भाषणेही झाली जोरदार.. तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार...

आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमचे मुख्याध्यापक ..................... यांना आमंत्रित करतो/करते.

(वरील सूत्रसंचालन हा फक्त एक नमुना आहे.आपण आपल्या सोयीनुसार योग्य ते बदल करावेत,ही विनंती.)

Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post