फक्त 9 रुपयांमध्ये मिळवा 25000 रुपयांपर्यंतचा Firecracker Insurance..
दीपावली हा भारतातील सर्वात लोकप्रिय,आवडता व आनंददायी सण आहे. प्राचीन काळापासून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे दीपावलीचा सण. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे दीपावलीचा सण.. दीपावली म्हणजे दीपोत्सव..!!
दीपावली आणि फटाके ..
दीपावली मध्ये फक्त दीपोत्सवच साजरा केला जात नाही तर त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी देखील असते. फटाक्यांची आतिषबाजी करत असताना कळत नकळतपणे अनेक दुर्घटना देखील होतात. आपल्या कुटुंबीयांना इजा होऊ शकते, दुखापत देखील होऊ शकते. एकीकडे दिवाळीमध्ये अगोदरच खूप खर्च झालेला असतो आणि त्यामध्ये जर अशी दुर्घटना घडली तर आपले आर्थिक बजेट नक्कीच कोलमडून जाऊ शकते. अशा वेळेस आपल्याकडे जर Firecracker Insurance असेल तर..
PhonePe Firecracker Insurance
आपल्या सर्वांच्या मोबाईल मध्ये PhonePe नावाचे ॲप हे नक्कीच असेल.आर्थिक व्यवहाराच्या अनेक सुविधा प्रदान करण्याबरोबरच हे ॲप आपल्याला आता अनेक विमा सुविधा देखील पुरवत आहे आणि तेही अत्यल्प दरात. PhonePe ॲप वरती फटाक्यांमुळे दीपावली मध्ये होणाऱ्या अनपेक्षित दुर्घटनांचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी Firecracker Insurance सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि तेही अगदी अत्यल्प दरात म्हणजे फक्त 9 रुपयात.
9 रुपयात 25000 रुपयांचा इन्शुरन्स
चला तर जाणून घेऊया या विमा योजनेविषयी..
- Firecracker
Insurance नक्की काय आहे ?
दीपावलीमध्ये फटाक्यांमुळे ज्या दुर्घटना होतात त्यामुळे होणारा दवाखान्याच्या खर्चाचा भार 25000 रुपयांपर्यंत या इन्शुरन्सद्वारे कव्हर केला जातो.
- यामध्ये एकूण किती व्यक्ती कव्हर केल्या जातात ?
एका कुटुंबातील पती-पत्नी व त्यांची दोन अपत्ये यांना या विम्याचा लाभ मिळतो. फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यू प्रसंगी मात्र या विम्याचा लाभ हा फक्त विमाधारकापुरताच मर्यादित असतो.
- या
विम्याचा कालावधी किती असतो ?
- या विम्याचा कालावधी विमा खरेदी पासून पुढील फक्त 10
दिवस असतो.
- जर हा विमा आपण 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी खरेदी केला तर याचा लाभ आपल्याला 25 ऑक्टोबर 2024 पासून पुढील 10 दिवसांपर्यंत मिळेल.
- तसेच आपण हा विमा जर 25 ऑक्टोबर 2024 नंतर खरेदी केला तर याचा लाभ आपल्याला तेथून पुढे 10 दिवस मिळेल.
लक्षात असू द्या..
- हा विमा फक्त दहा दिवसांपर्यंतच वैध आहे.
- आपण हा विमा खरेदी केल्यास 25 ऑक्टोबर 2024 पासून पुढील दहा दिवसांपर्यंत आपल्याला याचे लाभ मिळतील.
- फक्त दीपावलीमध्ये फटाक्यांमुळे होणारे अपघात यामध्ये कव्हर होतील.
- पर्यावरणास अनुकूल दीपावली आपण साजरी करावी.
- हा विमा खरेदी करण्यापूर्वी कृपया PhonePe वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.