क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी 3 जानेवारी या रोजी मोठ्या उत्साहाने बालिका दिन म्हणून साजरी केली जाते.या दिवशी अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्या अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सूत्रसंचालनाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे.याचा वापर करून आपण देखील उत्कृष्ठ सूत्रसंचालन करू शकता ..
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
त्याग करुनी ऐश्वर्य संपन्न सुखी संसाराचा, केले
तिने जीवाचे रान..
विद्येचे दान दिले समस्त स्त्रियांना, अशी आमची सावित्री महान..
अशी आमची सावित्री महान..
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचविले.. चूल आणि मूल याही
पलीकडे जीवन असते हे ज्यांनी आम्हाला दाखविले.. अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. भारतातील समस्त बालिकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश आणणाऱ्या तसेच
त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बालिका
दिन म्हणून साजरी करत असतो. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका, ज्ञानाई, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती असे अनेक बहुमान ज्यांच्या त्यागापुढे आणि कार्यापुढे तोकडे पडतील अशा थोर रणरागिणी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये क्रांती घडविणाऱ्या क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची आज जयंती व ती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी -------------------- या ठिकाणी उपस्थित
सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो/करते.
📌अध्यक्ष निवड
ज्यांची
उपस्थिती वाढविते
आपल्या
कार्यक्रमाची शान,
स्वीकारूनी
आमची विनंती
आपण
भूषवावे अध्यक्षस्थान..
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा ध्यास मनी
बाळगून शाळेला सदैव मदत करणारे श्री ------------------- हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी
मी त्यांना विनंती करतो/करते.
📌प्रमुख पाहुणे
कोणतेही काम हे एकट्या व्यक्तीकडून साध्य होणे अवघड
असते, सर्वांची साथ असेल
तर कार्य सुलभ होते. ‘एकमेका साह्य करू
अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये नेहमीच मोलाची भूमिका
बजावणारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर -------------------- हे प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी
त्यांना विनंती करतो/करते.
📌प्रतिमा पूजन
सुमंगल वातावरणात करूया आराधना ज्ञानज्योतीची,
करुनी प्रतिमापूजन सुरुवात करूया आजच्या
कार्यक्रमाची.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तसेच सर्व
सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर यांनी या ठिकाणी प्रतिमापूजन करावे, अशी मी त्यांना
विनंती करतो/करते.
📌स्वागत गीत
नुकतेच प्रतिमापूजन संपन्न झालेले आहे. आलेल्या मान्यवरांचे
स्वागत करणे ही रीत आहे भारतीय संस्कृतीची.. चला तर तयारी करूया मान्यवरांच्या स्वागताची..
आपल्या शाळेतील -------------------- हे विद्यार्थी या ठिकाणी स्वागत गीत सादर करणार
आहेत, तरी मी त्यांना
स्वागत गीतासाठी आमंत्रित करतो/करते.
📌प्रास्ताविक
सुखदुःखाच्या
छायेतून जसे
कळते
सार अवघ्या जीवनाचे
आत्मा
कार्यक्रमाचा दर्शविते
असे महत्त्व प्रास्ताविकाचे..
प्रास्ताविकातून आपल्याला कार्यक्रमाचा सारं कळत असतो, म्हणून आपल्याा शाळेतील आदरणीय श्री-------------------- हे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
📌विद्यार्थ्यांची मनोगते
स्त्रियांच्या
अंधाऱ्या जीवनात पेटविला ज्ञानाच्या ज्योती
म्हणून
तर आज जगती अमर आहे सावित्री.. अमर आहे सावित्री..
सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास जितका खडतर
तितकाच तो प्रेरणादायी देखील आहे. त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आपल्या भाषणातून
आपल्यासमोर मांडण्यासाठी आपल्या शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी आपली मनोगते सादर करणार
आहेत. तरी आपण सर्वांनी
सर्व विद्यार्थ्यांची मनोगते शांतपणे ऐकावीत व त्यांना प्रोत्साहन द्यावे, ही
विनंती.
📌तज्ञ मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी वेळोवेळी
तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. आपल्या ज्ञान कुंभातून विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक, प्रेरक विचार सादर करण्यासाठी, त्यांना योग्य
मार्गदर्शन करण्यासाठी मी श्री -------------------- यांना या ठिकाणी आमंत्रित करतो/करते.
📌अध्यक्षीय भाषण
ज्ञानरूपी
मार्गाच्या पदक्रमांतून कळस गाठू प्रगतीचा
त्यासाठी
मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा..
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या
भरभराटीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना बहुमोल मार्गदर्शन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री यांना या ठिकाणी आमंत्रित करतो/करते.
📌आभार प्रदर्शन
मान्यवरांच्या आगमनाने कार्यक्रमाला खरी शोभा आली,
सर्वांच्या
मार्गदर्शनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली,
शेवटी
आता समारोपाची म्हणजेच आभार प्रदर्शनाची वेळ झाली..
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यासाठी, तसेच हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार
व्यक्त करण्यासाठी मी आमचे मुख्याध्यापक श्री ------------------- यांना या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी
आमंत्रित करतो/करते.