संविधान दिन ..

भारतीय संविधान दिन

भारतामध्ये दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आपण भारतीय संविधान दिनाविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

sanvidhan din


📘संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो ?

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली व तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली.26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

📘पार्श्वभूमी

सन 2015 हे भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष असल्याने सरकारने मे 2015 मध्ये हे वर्ष मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय घेतला. वर्षभर चालणाऱ्या उत्सवांसाठी भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभागांकडून वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. ऑक्टोबर 2015 मध्ये मुंबईतील इंदू मिल कंपाऊंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पायाभरणी करताना उत्सवाचा एक भाग म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली. नोव्हेंबर 2015 मध्ये भारत सरकारने अधिसूचनेद्वारे अधिकृतपणे हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

📘भारताचे संविधान ⇒ उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक,

भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास: 

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये 

व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 

यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; 

आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे 

हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.

📘संविधान दिनाची रूपरेषा

26 नोव्हेंबर हा दिवस सर्वच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी मोठ्या उत्साहात व आनंदाने संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण खालील प्रकारचे उपक्रम आयोजित करू शकतो.

  • संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणे.
  • वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे.
  • वाद विवाद स्पर्धा आयोजित करणे.
  • निबंध स्पर्धा आयोजित करणे.
  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

📘महत्व 

  • 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन हा भारतीय इतिहासामध्ये खूप महत्त्वपूर्ण असा दिवस आहे.
  • संवैधानिक मूल्यांबाबत जनजागृती होण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होणे आवश्यक आहे.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
एकंदरीत भारतीय संविधानाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करावा.



 

Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post