मतदार यादीत आपले नाव शोधा.. तेही फक्त 1 मिनिटात ..

सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जर तुम्हाला देखील या मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षपणे सहभागी व्हायचे असेल तर खालील माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

Voter Name Search


मतदानाचा अधिकार हा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला एक घटनात्मक अधिकार आहे. मतदानासाठी पात्र असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याची व राजकीय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी मताधिकारामुळे उपलब्ध झालेली आहे.18 वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार प्रदान केलेला आहे. मतदान प्रक्रियेत प्रत्यक्षपणे
सहभागी होण्यासाठी आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे. आपले नाव मतदान यादी मध्ये समाविष्ट आहे किंवा नाही तसेच आपले नाव मतदान यादी मध्ये समाविष्ट असल्यास आपला मतदान यादीतील अनुक्रमांक तसेच मतदान केंद्र क्रमांक व ठिकाण जाणून घेण्यासाठी खालील सांगितल्याप्रमाणे कृती करा.

मतदान यादी मध्ये आपले नाव शोधण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. खालील लिंक ला क्लिक करून आपण या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Click here..

वरील लिंक ओपन केल्यावर आपल्याला एक नवीन  पेज दिसेल.त्यानंतर आपल्याला Voter Name Search या टॅब वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन  पेज ओपन होईल. या पेज वरती आपल्याला मतदान यादी मध्ये आपले नाव शोधण्यासाठी तीन पर्याय दिलेले आहेत. आपण त्यांची क्रमाक्रमाने माहिती बघूया.

मतदान यादी मध्ये आपले नाव शोधण्यासाठी आपल्याला खालील तीन पद्धतींचा अवलंब करता येईल.

🔎ईपीआयसी द्वारा खोजे/Search by Epic

  • वरील टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन  पेज ओपन होईल.
  • यामध्ये आपल्याला सर्वप्रथम भाषा निवडायची आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपला Epic नंबर म्हणजेच मतदान कार्ड क्रमांक नमूद करावयाचा आहे.
  • त्यानंतर राज्य निवडायचे आहे.
  • रिकाम्या बॉक्समध्ये दिलेला Captcha कोड टाकावयाचा आहे Search या बटणावरती क्लिक करावयाचे आहे.
  • समोरील पेजवर आपल्याला आपल्या मतदान यादीतील सर्व डिटेल्स पाहायला मिळतील

🔎विवरण द्वारा खोजे/Search by details 

  • या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपले राज्य व भाषा निवडून घ्यावी लागेल
  • त्यानंतर आपल्याला आपले नाव, आपल्या रिलेटिव्ह चे नाव, जन्मदिनांक किंवा वय,लिंग, लोकेशन डिटेल्स इत्यादी माहिती नमूद करावी लागेल.
  • त्यानंतर रिकाम्या बॉक्समध्ये दिलेला Captcha कोड टाकावयाचा आहे व Search या बटणावरती क्लिक करावयाचे आहे.
  • समोरील पेजवर आपल्याला आपल्या मतदान यादीतील सर्व डिटेल्स पाहायला मिळतील.

🔎मोबाईल द्वारा खोजे/Search by Mobile

  • या पद्धतीमध्ये वरील टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपले राज्य व भाषा निवडून घ्यायची आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर व दिलेला Captcha कोड टाकावयाचा आहे  Send OTP या बटणावरती क्लिक करावयाचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी नमूद करून आपल्याला Search या टॅब वरती क्लिक करावयाचे आहे
  • समोरील पेजवर आपल्याला आपले मतदान यादीतील सर्व डिटेल्स पाहायला मिळतील.

👉हे लक्षात असू द्या..

  • या पद्धतीचा वापर करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक मतदान कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.. तरच आपल्याला OTP प्राप्त होईल,याची नोंद घ्यावी.
  • मोबाईल क्रमांक मतदान कार्डशी लिंक करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला नमूद केलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म 8 भरावा लागेल.

 (या ब्लॉग वरील माहिती फक्त आपल्या मदतीकरिता आहे, हे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ नाही.)






Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post