आज प्रत्येकाच्या घरामध्ये आढळणारी वस्तू म्हणजे स्मार्टफोन. श्रीमंत-गरीब, लहान-मोठे, पगारदार-गृहिणी अशा सर्वांकडेच आजकाल स्मार्टफोन बघायला मिळतात. संदेशवहनासोबत स्मार्टफोनमुळे आपले मनोरंजन तर होतेच परंतु त्याचबरोबर स्मार्टफोनचा योग्य पद्धतीने आपण जर उपयोग केला तर त्यामुळे आपले काम देखील खूप सोपे होऊ शकते.आपल्या मोबाईल मध्ये शेकडो ॲप्स असतात. आज मी तुम्हाला अशा ॲप बद्दल माहिती सांगणार आहे की ते ॲप आपले शेकडो कामे करू शकेल.
डॉक्युमेंट स्कॅनर ॲप - महत्त्व
पूर्वी आपण आपले शैक्षणिक तसेच वैयक्तिक कागदपत्रे
जतन करून ठेवण्यासाठी फाईल वापरायचो. परंतु प्रत्येक वेळेस आपण आपली कागदपत्रांची फाईल सोबत ठेवू शकत नाही. काही वेळेस आपल्याला
आपल्या एखाद्या डॉक्युमेंटची अचानक गरज भासते परंतु ते आपल्याजवळ उपलब्ध असत नाही. अशा वेळेस जर आपण
आपली सर्व कागदपत्रे एखाद्या डॉक्युमेंट स्कॅनर ॲप मध्ये स्कॅन करून ठेवली तर आपण त्यांचा केव्हाही
आणि कुठेही वापर करू शकतो. त्याची प्रिंट काढू शकतो किंवा ते JPEG किंवा PDF फॉरमॅट मध्ये इतरांना पाठवू शकतो. याचाच अर्थ आपल्याला आता आपल्या कागदपत्रांची फाईल
सोबत बाळगण्याची गरज नाही कारण आपल्या स्मार्टफोन मधील डॉक्युमेंट स्कॅनर ॲप आपली मदत करेल.
डॉक्युमेंट स्कॅनर ॲपचे प्रकार
गुगल प्ले स्टोअर वरती अनेक प्रकारचे डॉक्युमेंट
स्कॅनर ॲप आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील बऱ्याच ॲपमधील प्रीमियम फीचर हे त्यांच्या पेड व्हर्जनमध्ये उपलब्ध असतात. फ्री व्हर्जन मध्ये आपण ते प्रीमियम फीचर वापरू शकत नाही. परंतु आज मी तुम्हाला
अशा ॲप बद्दल माहिती सांगणार आहे की ज्यातील फ्री व्हर्जन मध्येच खूप सारे
प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया माझ्या दृष्टीने सर्वोत्तम डॉक्युमेंट स्कॅनर ॲपविषयी..
Appचे नाव 👉 DOC SCANNER
- या सर्व गुणसंपन्न ॲप चे नाव आहे DOC SCANNER.
- गुगल प्ले स्टोअर वरती आपण DOC SCANNER असे टाईप केल्यास आपल्याला वरील ॲप दिसेल ते आपण
इन्स्टॉल करून घ्यावे.
- आपल्या सोयीसाठी मी आपल्याला या ठिकाणी या ॲपची डाउनलोड लिंक खाली उपलब्ध करून
देत आहे, त्या लिंक वरती क्लिक
करून देखील आपण हे ॲप आपल्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करू शकता.
Click here to Download DOC SCANNER App
DOC SCANNER – वापर कसा करावा?
- सर्वप्रथम आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप
इन्स्टॉल करून घ्यावे.
- त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट स्कॅन करावयाचे
आहे ते समोर धरून या ॲपमधील कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे व त्या डॉक्युमेंटचा फोटो
काढून घ्यावा.
- त्यानंतर त्या डॉक्युमेंटचे कोपरे व्यवस्थित क्रॉप
करून घ्यावे व Continue या टॅब वरती क्लिक
करावे व डॉक्युमेंट सेव्ह करावे.
- वरील स्टेप्स फॉलो करून आपण आपले डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवावे.
जाणून घेवूया या DOC SCANNER च्या प्रीमियम फीचर्स विषयी
📌Color Filter –
- स्कॅन केलेले डॉक्युमेंटचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला Original, Vibrant, Soft Tone, OCV Color, Sharp
Black, Carbon Black, Gray, Color Pop असे अनेक कलर फिल्टर
बघायला मिळतात.
- तसेच त्यांना आवश्यकतेप्रमाणे Adjust ही करता येते.
📌Eraser Tool –
- या टूलचा वापर करून आपण डॉक्युमेंट मधील अनावश्यक तसेच खराब असलेला भाग
सहजपणे पुसून टाकू शकतो. या टूलचा वापर करून आपण आपली जुने कागदपत्रे देखील चांगल्या प्रकारे
स्कॅन करू शकतो, त्यांचा दर्जा सुधारू शकतो.
📌 Signature -
हे खूपच उपयुक्त असे प्रीमियम फीचर आहे. या फीचरचा वापर करून आपण स्कॅन केलेल्या
डॉक्युमेंट मध्ये आपले सिग्नेचर ऍड करू शकतो. या फिचरचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो.
📌Watermark -
- स्कॅन केलेल्या कागदपत्रावरती जर आपल्याला वॉटर मार्क ऍड करायचा असेल तर या फिचरचा वापर करावा. या टूलचा वापर करून
आपण वाटरमार्क ॲड करू शकता.
📌Multiside Doc –
- हे देखील एक अतिशय उपयुक्त असे प्रीमियम पिक्चर आहे. या फीचर चा वापर
करून आपण आपले ओळखपत्र जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड हे Front आणि Back असे एकाच साईडवर
ॲडजस्ट करू शकता.
📌 Merge Documents -
- या टूलचा वापर करून आपल्याला आपले अनेक डॉक्युमेंट एकाच ठिकाणी मर्ज करता येईल.
📌Compress -
- बऱ्याच वेळेस आपल्याला एखादा ऑनलाइन अर्ज भरावयाचा असतो. तो अर्ज भरत असताना
आपल्याला अनेक डॉक्युमेंट वेबसाईट वरती अपलोड करावी लागतात व त्यांची साईज कमी
करावी लागते. अशा वेळेस या टूलचा वापर करून आपण आपले डॉक्युमेंट वेगवेगळ्या साईज मध्ये
कॉम्प्रेस करू शकता आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्या डॉक्युमेंटचा दर्जा देखील
कायम राखल्या जातो.
📌Import Export सुविधा –
- या ॲप मध्ये आपल्याला इतर ठिकाणाहून डॉक्युमेंट सहजपणे इम्पोर्ट करता येतात.
- त्याचबरोबर आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट अगदी सहजपणे इतर ठिकाणी एक्सपोर्ट देखील करू शकतो.
- Import Export सुविधा ही PDF व JPEG अशा दोन्ही फॉरमॅटसाठी लागू आहे.
📌Create Folder -
- स्कॅन केलेल्या कागदपत्रांचे सोयीनुसार वर्गीकरण करून आपण त्यांना वेगवेगळ्या फोल्डरमध्ये
ऑर्गनाईज करू शकतो.
- हे आपल्या सोयीसाठी खूप उपयुक्त असे फीचर आहे.
📌 PDF Reader -
- या ॲपचा वापर आपण एका उत्कृष्ट अशा पीडीएफ रीडर प्रमाणे करू शकतो.
📌Sync Now –
- आपण स्कॅन करून ठेवलेली कागदपत्रे वेळोवेळी Sync करावी.
- कारण ज्यावेळेस आपण आपला स्मार्टफोन बदलतो
त्यावेळेस आपण या ऑप्शनचा वापर करून आपल्या जुन्या स्मार्टफोनमधील कागदपत्रे नवीन
स्मार्टफोनमध्ये सहजपणे घेऊ शकतो.
- डॉक्युमेंट Sync केलेले असल्यास आपल्याला पुन्हा त्यांना स्कॅन
करण्याची आवश्यकता राहत नाही.
एकंदरीत वरील सर्व प्रीमियम फीचर फ्री मध्ये उपलब्ध असलेले एकमेव सर्वोत्तम असे हे ॲप आहे.
(वरील माहिती ही माझ्या वैयक्तिक अनुभवावर व अभ्यासावर आधारलेली आहे, व्यक्तीपरत्वे
यामध्ये मत भिन्नता असू शकते.)
Tags
TechHelp