प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना 2024-25
🔰या योजनेविषयी थोडक्यात ..
ही एक सरकारी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक
आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळते. जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे
नुकसान झाले तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते व अशा रीतीने
शेतकरी आर्थिक संकटात जाण्यापासून वाचू शकतात.
🔰या योजनेचे फायदे
- अतिवृष्टी,महापूर,दुष्काळ,गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. अशा वेळेस त्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देते.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा प्रीमियम देखील खूप कमी आहे. केवळ एक रुपयांमध्ये आपण आपला रब्बी पिक विमा योजनेचा अर्ज भरू शकतो.
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया देखील खूप जलद आणि सोपी आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.
- या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात तसेच या योजनेमध्ये बहुतांश पिकांना विमा संरक्षण दिल्या जाते.
🔰 प्रधानमंत्री रबी पिक विमा
योजनेची वैशिष्ट्ये
- ही विमा योजना रब्बी हंगामातील पिकांसाठी लागू आहे. रब्बी हंगाम हा साधारणपणे ऑक्टोबर पासून सुरू होऊन मार्च पर्यंत चालतो. या कालावधी दरम्यान हवामान अतिशय थंड असते तसेच काही ठिकाणी गारपीट होते त्यामुळे पिकांना याचा धोका होऊ शकतो.
- थंडी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या गुणवत्तेत घट होते.त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी ही रब्बी पिक विमा योजना अतिशय महत्त्वाची आहे.
- शासन परिपत्रकानुसार रब्बी हंगाम 2024-25 मध्ये गहू(बागायत), रबी ज्वारी(बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रबी कांदा ही पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन देखील आपल्याला अर्ज करता येईल.
- या विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला अत्यल्प म्हणजे एक रुपया प्रीमियम भरावा लागेल. प्रीमियमचा दर अत्यल्प असल्यामुळे सर्वच शेतकरी सहजरित्या या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
🔰या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट-
👆वरील Website चा वापर करून आपण आपला
ऑनलाईन अर्ज स्वतःचं भरू शकता.
🔰 या योजनेची कार्यपद्धती
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. 👉 CLICK HERE
- ऑनलाइन पिकांची नोंदणी झाल्यानंतर आपल्याला आपला प्रीमियम देखील भरावा लागेल.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला जर आपले काही नुकसान झाले तर त्वरित त्याची तक्रार नोंदवावी लागेल.
- विमा कंपनीस संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा. 👉CLICK HERE
- आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल व नंतर आपल्याला विम्याचे सर्व लाभ मिळतील.
🔰अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- 7/12
- 8 अ
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिक पेरा घोषणापत्र
🔖अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक ही ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2024 व गहू,हरभरा या पिकांसाठी 15 डिसेंबर 2024 याप्रमाणे आहे.
🔖आपल्याला या संदर्भात काही अडचण असल्यास आपण कृषी रक्षक पोर्टलच्या संपर्क क्रमांक 14447 वरती कॉल करून माहिती मिळवू शकता.
(या
पोस्टमध्ये दिलेली माहिती ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे.
कृपया सर्व माहितीची पडताळणी करावी.)
Tags
GovernmentSchemes